प्रभादेवीत वाळूवरील कबड्डीत अमर संदेश, गुड मॉर्निंग, विजय क्लब, जागृती यांची उप उपांत्य फेरीत मजल

जुनी प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या विध्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने संपूर्ण मुंबई मध्ये प्रथमच.

एका मंडळाने आयोजित केलेल्या “बीच कबड्डी (ज्युनिअर मुले) कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात विकासाने न्यु परशुराम मंडळाचा ४२-२१ असा पराभव करून स्पर्धेची उपउपांत्य फेरी गाठली.

विजयी संघाकडून अवधूत शिंदे आणि विराज सिंग यांनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले मध्यांताराला २४-०९ अशी आघाडी विकासकडे कडे होती, पराभूत संघाचा शुभम नलावडे चमकला.

दुसऱ्या सामन्यात मध्यांताराला २३-०५ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या सिद्धीप्रभाने शिवनेरी सेवा मंडळाचे चे आव्हान ४५-१५ असे संपुष्टात  आणले सिद्धीप्रभा कडून ओंकार ढवळे, अनिकेत भेसलेकर यांनी चढाया तर सागर सुर्वे आणि ऋतुराज साळुंखे ने सुंदर पकडी केल्या. शिवनेरी कडून ओंकार साळुंखे बारा खेळला.

तिसऱ्या सामन्यात चुरस पाहायला मिळाली दुर्गामाता आणि वीर संताजी दोन्ही संघ विजयासाठी चिकाटीने प्रयत्न करीत होते मध्यांताराला ३०-१८ अशी गुणस्थिती असताना वीर संताजीने आपलं खेळ उंचावला.

त्यांच्या ओंकार गुरव आणि तन्मय गुरव या गुरव बंधूंचे प्रयत्न वाया गेले शेवटी दुर्गामाताने त्यांना ४९-४१ असे ८ गुणांनी पराभूत केले व स्पर्धेची उप उपांत्य फेरी गाठली दुर्गामाता कडून प्रथमेश पालांडे आणि शुभम इंगळे ने अष्टपैलू खेळ केला.

आणखी एका सामन्यात साइराजने ने गोलफादेवीला चुरशीच्या सामन्यात ४०-३६ या फरकाने नमविले. साईराज कडून राज सकपाळ आणी तेजस चाळके यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले गोलफादेवीच्या सिद्धेश प्रतीक भुवड आणि शिवम मिश्रा यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल अर्जुन पुरस्कार विजेते आणि आंतराष्ट्रीय खेळाडू श्री. राजू भावसार तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. माजी संयुक्त कार्यवाह आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असो. चे प्रमुख कार्यवाह श्री. रवींद्र देसाई  यांनी उपस्तीत राहून मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले.