आयपीएलमध्ये 600 धावा केलेला हा खेळाडू वापरत नाही फोन!

21 व्या शतकात फोन वापरत नाहीत अशा व्यक्ती क्वचितच पहायला मिळतात आणि जर ती व्यक्ती क्रिकेटपटू असेल तर मात्र आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही. पण असा एक क्रिकेटपटू आहे जो आजही फोन वापरत नाही.

हा क्रिकेटपटू म्हणजे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना यावर्षी 600 पेक्षा जास्त धावा करणारा अंबाती रायडू.

याबद्दलची माहिती स्वत: रायडूने ‘क्विक हिल भज्जी ब्लास्ट विथ सीएसके’ या शोमध्ये दिली. या शोमध्ये रायडूची मुलाखत हरभजन सिंगने घेतली.

शोमध्ये हरभजनने जेव्हा सांगितले की काही दिवसांपूर्वी एका अनोळखी नंबरवरुन अचानक रायडूचा फोन आला तेव्हा त्याला आनंद झाला. पण लगेचच रायडूने खुलासा केला की तो फोननंबर त्याचा नसुन त्याच्या पत्नीचा होता. पत्नीच्या फोनवरुन त्याने हरभजनला फोन केला होता.

त्यामुळे फोन न वापरण्याचे कारण हरभजनने रायडूला विचारले. यावर रायडू म्हणाला, “मला असे वाटते की मी जर कोणता विचार करत असेल तर मधेच कोणाचा फोन आला तर विचार थांबतात.”

यावर हरभजन विचारले असा काय विचार करतो तू? त्यावर हसून रायडू म्हणाला, ” असे नाही पण मी जर शेतातील काम करत असेल आणि कोणाचा फोन आला आणि तो व्यक्ती कोणत्या गोष्टी सांगायला लागला तर मग माझा मूड बदलतो.”

याशिवाय हरभजन सिंगच्या या शोमध्ये अनेक गोष्टींविषयी रायडूने गप्पा मारल्या. रायडूने यावर्षी आयपीएलमध्ये चेन्नईकडून 16 सामन्यात 43 च्या सरासरीने 602 धावा केल्या आहेत. तसेच तो यावर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

संपुर्ण यादी- दुपारच्या सत्रात प्रो-कबड्डीमध्ये लागल्या या खेळाडूंवर बोली

आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा

-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली

-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख

-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू