अंबाती रायडूने जगातील सर्वात आवडती गोष्ट केवळ टीम इंडियासाठी सोडली

विंडीज विरुद्धच्या वनडे सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या अंबाती रायडूने उत्कृष्ठ फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या रायडूने मुंबईत झालेल्या चौथ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी केली.

रायडूने जरी सध्या उत्तम कामगिरी केली असली तरी त्याचा संघात परत येण्याचा मार्ग खडतर होता. आयपीएलमध्ये (इंंडियन प्रीमियर लीग) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने धमाकेदार फलंदाजी केली होती. यामुळेच त्याची इंग्लंड विरुद्धच्या वन-डे सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आली होती. पण यो-यो टेस्टमुळे तो या दौऱ्यासाठी मुकला होता.

या दरम्यान त्याने फिटनेसवर चांगलेच लक्ष दिले आणि टेस्टमध्ये पास होत विंडीज विरुद्धच्या वनडे संघात जागा मिळवली. यावेळी त्याने त्याचा आवडता पदार्थचा त्याग केला होता.

‘खाण्याच्या सवयी बदलल्याने मी आता संघात परत आलो’ असे तो मोहम्मद कैफ आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी स्टार स्पोर्ट्समध्ये बोलताना रायडूने सांगितले.

या गप्पामध्ये त्याने मला बिर्याणी खूप आवडल्याचे सांगितले आहे. पण भारतीय संघाची निळी जर्सी परत घालता यावी म्हणून मी ती खाण्याची सोडली, असेही तो म्हणाला.

रायडूचा हा त्याग त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघात जागा करून देण्यात उपयोगी ठरला. तसेच २०१९मध्ये इंग्लंडला होणाऱ्या विश्वचषकासाठीही महत्त्वाची भुमिका निभावणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

केवळ एकच सामना खेळलेल्या उसेन बोल्टने फुटबॉल क्लबला केले अलविदा

धोनीबरोबरच टी२० खेळत नसलेला खेळाडू म्हणतोय, धोनी संघाचा अविभाज्य भाग आहे

विराटचं ठीक आहे, बाकी खेळाडूंची आयसीसी क्रमवारी नक्की पहा