स्टार क्रिकेटर अंबाती रायडूने घोषित केली निवृत्ती

नुकत्याच झालेल्या विंडीज विरुद्धच्या वन-डे मालिकेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अंबाती रायडूने भारताकडून एकही कसोटी खेळला नाही पण त्याने आता देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.

हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनला लिहलेल्या पत्रात त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे लिहले आहे.

“मी आतंरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मर्यादित षटकाचे क्रिकेट सामने खेळणार आहे. तसेच मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे आभार मानतो”, असेही त्याने या पत्रात लिहले आहे.

“हैद्राबादकडून खेळणे हे नेहमीच अभिमानास्पद आहे. तसेच बीसीसीआयने मला पुनरागमन करण्याची संधी दिली हे विशेष आहे.”

विंडीज विरुद्धच्या वनडे सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या रायडूने उत्कृष्ठ फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या रायडूने मुंबईत झालेल्या चौथ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: या गोलंदाजाने नो-बॉलवर झेल घेत केले सेलिब्रेशन, घडला गमतीशीर किस्सा

विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे असेल सर्वांचे लक्ष

17 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये झाला होता सेहवाग नावाच्या वादळाचा प्रवेश