रायडूच्या यशामागे कर्णधार विराट कोहलीची बँट

२०१८ च्या आयपीएलमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे, चेन्नई सुपरकिंग्सचा अंबाती रायडू. चेन्नईला २०१८ ची आयपीएल स्पर्धा जिकूंन देण्यात रायडूचे विशेष योगदान आहे. रायडूने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना १६ सामन्यात ४३ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या.

नुकतेच त्याने आपल्या चेन्नई संघातील सहकारी हरभजन सिंगशी “भज्जी ब्लास्ट” या कार्यक्रमात रायडूने एक गुपीत उघड केले.

त्यामधे त्याने सांगितले की, तो दरवर्षी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कडून एक बॅट घेतो.

तो असे म्हणाला की, “मैं विराट से हर साल एक बॅट लेता हूँ, अब ऊसको भी मालूम पड गया हैं की टशन हैं. इस टाईम विराटने गाली देके बँट दिया हैं.”

तसेच रायडूने सांगितले की, त्याला लहाणपणी क्रिकेटची आवड नव्हती. पण वडिलांच्या आग्रहामुळे मी क्रिकेट खेळू लागलो.

त्याचबरोबर हरभजननेही रायडू मोबाईलही वापरत नसल्याचे ऊघड केले.

या कार्यक्रमात सचिन, लक्षमण आणि पाँन्टींग आपले आयडाँल असल्याचे रायडूने सांगितले.