मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत उपस्थित !

महान क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी राज्यसभेत उपस्थित होता. सचिनने यात एकही प्रश्न विचारला नाही. सचिन बरोबरच बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम ही राज्यसभेत उपस्थित होती.

मंगळवारी समाजवादी पार्टीचे एमपी नरेश अग्रवाल यांनी सचिनच्या अनुपस्तितीचा मुद्दा उचलून धरला होता. त्याचीच रिऍक्शन म्हणून की काय, सचिन लगेचच गुरुवारी राज्यसभेत दिसला.

“जर त्यांना संसदेत यायला जमणार नसेल तर त्यानी राजीनामा द्यवा” असे अग्रवाल म्हणाले होते. सचिन तेंडुलकर आणि सिने अभिनेत्री रेखा यांची राज्यसभेत सर्वात कमी उपस्थिती आहे.

सूत्रांच्या माहितीप्रमाणे सचिनची राज्यसभेतील उपस्थिती ही २५ अधिवेशनांपैकी केवळ २ यांना होती. सचिनने ८ पैकी केवळ एका बजेट सत्राला हजेरी लावली आहे.

सचिनची २०१२ मध्ये राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. राज्यसभा सदस्यांची सरासरी उपस्थिती ही सध्या ७८% आहे. परंतु सचिनची उपस्थिती ही अतिशय कमी आहे.

२०१४मध्ये सुद्धा सचिनच्या अनुपस्थितीचा वाद पुढे आला होता.