एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला बॉक्सर अमित पांघलने शनिवारी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने हे सुवर्णपदक बॉक्सिंगच्या लाइट फ्लाय प्रकारात (49 किलो वजनीगटात) मिळवले आहे.

त्याने अंतिम सामन्यात आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबॉय दुस्मातोव्हचा 3-2 ने पराभव करत भारताला एशियन गेम्समध्ये आत्तापर्यंतचे बॉक्सिंगमधील आठवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

यावर्षीच्या एशियन गेम्समध्ये बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत पोहचलेला पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच तो पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये खेळत होता.

या लढतीत त्याने उझबेकिस्तानच्या दुस्मातोव्हला रोखून ठेवण्यासाठी उत्तम बचावात्मक तंत्र वापरले. दुस्मातोव्ह हा त्याच्या काउंटर अॅटॅकसाठी ओळखला जातो.

त्याप्रमाणे तो अमितवर अॅटॅक करण्याचा प्रयत्न करत होता. पण अमितने त्याचा चांगला प्रतिकार केला. त्यामुळे त्रासलेल्या दुस्मातोव्हवर विजय मिळवण्यास अमितला मदत झाली.

याआधी मागील वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुस्मातोव्हने अमितवर विजय मिळवला होता. तसेच या स्पर्धेत दुस्मातोव्हला रौप्यपदक मिळाले होते.

अमितने याआधी मागील वर्षी एशियन चॅम्पियशिपमध्ये कांस्यपदक मिळवले होते. तसेच यावर्षी गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने रौप्यपदक मिळवले होते.

याबरोबरच तो यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या इंडिया ओपनमध्ये आणि मानाचे मानले जाणाऱ्या स्ट्रांजा मेमोरियल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले हाते.

याआधी भारताकडून एशियन गेम्स स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये शेवटचे सुवर्णपदक विजेंदर सिंग आणि विकास क्रिश्ननने 2010 ला मिळवून दिले होते.

यावेळी एशियन गेम्स 2018 मध्ये विकासला 75 किलो वजनीगटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताने मिळवली एशियन गेम्सच्या इतिहासातील सर्वाधिक पदके

 वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड

 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद

 बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार