आणि स्म्रिती मानधनासाठी अरिजित सिंगने गायले ‘चन्ना मेरेया’

इंग्लंडवरून चांगली कामगिरी करून आलेल्या भारतीय महिला संघाच्या सदस्य सध्या चर्चेत आहेत त्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे. महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कार्यक्रमात परवा स्म्रिती मानधनासाठी खास अरिजीत सिंगने एक खास गाणे म्हटले.

जेव्हा स्म्रिती आणि अमिताभ गप्पा मारत होते तेव्हा स्म्रितीला तिचे आवडते गाणे विचारले असता तिने ‘चन्ना मेरेया’ असे सांगितले. तसेच फलंदाजीला जाण्यापूर्वी आपण हे गाणं नेहमी ऐकतो असेही ती पुढे म्हणाली.

अमिताभ बच्चन यांनी थोडाही वेळ न घालवता अरिजित सिंगला फोन करून हे गाणं गाण्याची विनंती केली. त्यावेळी अमिताभसह स्म्रितीही भावुक झाली होती. तसेच अरिजितसाठीही हा विसरण्यासाखा क्षण नव्हता.

https://twitter.com/HaLa_ARK/status/903813373476909056