विश्वचषक २०१९: असा आहे दक्षिण आफ्रिकेचा १५ जणांचा संघ; ताहीर, अमलाला मिळाली संधी

2019 विश्वचषकासाठी आज(18 एप्रिल) दक्षिण आफ्रिकेने 15 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघाचे नेतृत्व फाफ डु प्लेसिस करणार आहे. तसेच या संघात हाशिम आमलाला संधी मिळाली आहे. मात्र रिझा हेन्रीक्सला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर ख्रिस मॉरिसला या संघात संधी मिळालेली नाही.

या 15 जणांच्या संघात आमला ऐवजी हेन्रीक्सला संधी मिळेल अशी दाट शक्यता होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या निवड समीतीने अनुभवाला महत्त्व देत अमलाला संधी दिली आहे.

या संघात लुंगी एन्गिडी, एन्रिच नोर्जे, कागिसो रबाडा, डेल स्टेन आणि अँडील फेहलूकवायो हे वेगवान गोलंदाज असणार आहेत. तर ड्वेन प्रीटोरियस, इम्रान ताहीर आणि ताब्रिज शाम्सी या तिघांवर फिरकी गोलंदाजीची दबाबदारी असेल.

तसेच एडेन मार्करमला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या संघात विश्वचषकासाठी संधी मिळाली आहे. त्याची मागील काही दिवसात अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. त्याच्याबरोबरच रसी व्हॅन दर दसनचाही हा पहिलाच विश्वचषक असणार आहे.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज जेपी ड्यूमीनीचा हा शेवटचा विश्वचषक असणार आहे. तो या विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने यष्टीरक्षणासाठी मात्र क्विंनट डी कॉकवर पूर्ण विश्वास दाखवताना त्याच्यासाठी दुसऱ्या पर्यायी यष्टीरक्षकाची निवड केलेली नाही. गरज लागली तर कदाचीत डेव्हिड मिलर यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकतो.

असा आहे दक्षिण आफ्रिकेचा 2019साठी 15 जणांचा संघ – 

फाफ डु प्लेसीस (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, हाशिम अमला, एडेन मार्करम, रसी व्हॅन डर दसेन, ड्वेन प्रीटोरियस, अँडील फेहलुकवायो, कागीसो रबाडा, डेल स्टेन, लुंगी एन्गिडी, एन्रिच नोर्जे, इम्रान ताहिर, तब्रिज शम्सी

महत्त्वाच्या बातम्या –

रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ

विश्वचषक २०१९: असा आहे श्रीलंकेचा १५ जणांचा संघ; या अनुभवी खेळाडूंना संधी नाही

रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी