दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका, मोठा खेळाडू बाद

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका बसला आहे. चांगलाच स्थिरावलेला हाशिम अमला २३ धावा काढून तंबूत परतला आहे.

त्याने ३२ चेंडूत २३ धावा करताना ४ चौकार मारले. त्याला भुवनेश्वर कुमारने धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले.

अमला बाद झाल्यावर थोडावेळ मैदानातच थांबला होता. त्यानंतर तो रिव्हिव्हमध्ये स्पष्ट बाद झालेला दिसला. यावेळी त्याने हा रिव्हिव्ह घेतला होता.

धोनीला विक्रम करण्याची संधी
अमलाचा धोनीने घेतलेला हा झेल वनडेतील धोनीचा ३९९ वा यष्टीमागील बळी होता.