टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत आर्यन हूड, सानिका भोगाडेचा मुख्य फेरीत प्रवेश

पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन हूड, अमोद सबनीस, अंशित देशपांडे, सौमिल चोपडे यांनी, तर मुलींच्या गटात सानिका भोगाडे, माही शिंदे अपर्णा पतैत यांनी आपापल्या गटातील प्रतिस्परध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत 14वर्षाखालील मुलींच्या गटात सानिका भोगाडेने रिशिता अगरवालचा 6-0, 6-1असा, तर माही शिंदेने रिहाना रॉड्रिगेसचा 6-1, 6-0असा सहज पराभव केला. अपर्णा पतैतने तिस्या रावतवर 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

12 वर्षाखालील मुलांच्या गटात अमोद सबनीसने आदित्य सुर्वेचा टायब्रेकमध्ये 6-2, 6-7(2), 7-6(4)असा पराभव केला. सौमिल चोपडेने देवब्रत बॅनर्जीचा 6-3, 6-2 असा तर, अंशित देशपांडेने आदित्य यादवचा 6-1, 6-0असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

14वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यन हूडने पार्थ देवरूखकरला 6-1, 7-5असे नमविले. निशीथ रहाणे याने ईशान नाथनचा 6-0, 6-0असा एकतर्फी पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: 14 वर्षाखालील मुले:
निशीथ रहाणे वि.वि.ईशान नाथन 6-0, 6-0;
योहान चोकनी वि.वि.शर्विल पाटील 6-0, 2-6, 6-2;
आर्यन हूड वि.वि.पार्थ देवरूखकर 6-1, 7-5;

12वर्षाखालील मुले:
सौमिल चोपडे वि.वि.देवब्रत बॅनर्जी 6-3, 6-2;
अंशित देशपांडे वि.वि.आदित्य यादव 6-1, 6-0;
करण रावत वि.वि.पृथ्वीराज बारी 6-3, 6-3;
अभिराम निलाखे वि.वि.अथर्व रुईकर 6-1, 6-2;
अमोद सबनीस वि.वि.आदित्य सुर्वे 6-2, 6-7(2), 7-6(4);

14वर्षाखालील मुली:
माही शिंदे वि.वि.रिहाना रॉड्रिगेस 6-1, 6-0;
अपर्णा पतैत वि.वि.तिस्या रावत 6-2, 6-3;
सानिका भोगाडे वि.वि.रिशिता अगरवाल 6-0, 6-1;
इशान्या हतनकर वि.वि.सिद्धी खोत 6-3, 6-0;
आशी छाजेड वि.वि.चिन्मयी बागवे 6-2, 7-5.