अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी करत एकाकी लढत दिली.

त्याने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत केलेल्या शतकामुळे भारताला 274 धावांचा टप्पा गाठता आला. त्याने या सामन्यात 225 चेंडूत 149 धावांची खेळी केली. यात त्याने 22 चौकार आणि 1 षटकार मारला.

भारताच्या या डावात विराटने सर्वोच्च धावा केल्या होत्या, तर त्याच्या पाठोपाठ शिखर धवनच्या 26 धावा ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा होत्या. त्यामुळे विराटच्या या खेळीचे सर्वांकडून कौतुक झाले आहे.

यामुळेच अमुल या डेअरी ब्रँडनेही विराटचे कार्टुन रेखाटले आहे. यात विराटचे शतक केल्यानंतरचे सेलिब्रेशन आणि आक्रमकता दाखवली आहे. तसेच त्याच्या एकाकी लढतीला दाखवताना त्याला समुद्रात एका लाकडी बोटवर दाखवले आहे.

अमुल हे ताज्या घडामोडींच्या विविध विषयांवर कार्टुन बनवत असतात. त्यामुळे यावेळी त्यांनी विराटची खेळी या विषयावर कार्टुन काढले आहे.

तसेच त्यांनी विराटच्या या कार्टुनवर ‘विराटोसो परफॉर्मन्स’ असे लिहिले आहे, याचा अर्थ असा की ‘कौशल्यपूर्ण कामगिरी’.

विराटने केलेले हे शतक त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 57 वे तर कसोटीतील 22 वे शतक आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा

टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम

साहेबांच्या भूमीवर मराठमोळ्या स्म्रीती मानधनाचे वर्चस्व