Video- ना धोनी- ना विराट, या चाहत्याने धरले थेट सुनील छेत्रीचे पाय

मुंबई। नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये सर्वांनी विराट कोहली, एमएस धोनी या खेळाडूंच्या चाहत्याने त्यांचे पाय पकडलेले पाहिले आहे. त्याचबरोबर याआधीही क्रिकेटमध्ये चाहत्यांनी खेळाडूंचे पाय पकडल्याच्या घटना घडल्या आहेत.

पण अशीच घटना फूटबॉलमधेही घडली. झाले असे, मुंबईत इंटरकॉन्टीनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 4 जूनला पार पडलेल्या भारत विरुद्ध केनिया सामन्यात भारताने 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

या विजयानंतर भारतीय संघ एकमेकांशी हात मिळवत होते. त्याचवेळी अचानक एक चाहत्याने मैदानात येऊन भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला छेत्रीने पाय पकडू दिले नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे.

या सामन्याआधी भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने भारतीय चाहत्यांना फुटबॉलचे सामने स्टेडियममध्ये येऊन बघण्याचे भावनिक आवाहन केले होते. त्याच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

View this post on Instagram

Fan 😍😍

A post shared by virat kohli (@_.virat._kohlii) on

तसेच हा सामना छेत्रीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 वा सामना होता. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत होते.

भारताचा या स्पर्धेतील पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध ७ जूनला होणार आहे. या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. भारताने १ जूनला झालेल्या सलामीच्या सामन्यात चायनीज तिपेईला 5-0 असे पराभूत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या: 

२४ तासांतच विराट कोहलीसाठी चार मोठ्या गोड बातम्या

संपुर्ण यादी- बीसीसीआयचे २०१७-१८सालचे पुरस्कार घोषीत, कोहलीसह मंधाना, हरमनप्रीत कौरचाही होणार गौरव

फिफा विश्वचषक २०१८- ओळख ब गटाची

वनडेत १३ हजारपेक्षा जास्त धावा करणारा क्रिकेटर आॅस्ट्रेलियाच्या मदतीला

तामिल थलायवाजकडून कबड्डी अकादमी स्थापनेची घोषणा