जेव्हा वॉटर बॉय ऐवजी महिला देतात मैदानावर क्रिकेटपटूंना पाणी !

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात काही महिला ड्रिंक्स ब्रेकमध्ये भारतीय खेळाडूंना पाणी घेऊन जाताना दिसल्या. क्रिकेट मैदानावर अशा घटनेचा प्रेक्षक प्रथमच अनुभव घेत होते, त्यामुळेच ही एक चक्रावून टाकणारी परिस्थिती होती.

याबद्दल काही अधिकारी म्हटले की आम्ही परंपरेला छेद देत नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

पहिल्या दोन कसोटीमध्ये आपल्याला हे दृश्य दिसले होते. आता तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना पल्लेकेल येथे होत असून येथेही या महिला खेळाडूंना पाणी घेऊन जाताना दिसणार आहेत.

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सह संस्थापक भैरव शांथ यांनी याबद्दल बोलताना म्हटले आहे की आम्हाला थोडं परंपरेला छेद देत नवीन काहीतरी करायचं असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.

यापूर्वी १९३८ साली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले येथील मैदानात कसोटी सामन्यात महिलांनी खेळाडूंसाठी ड्रिंक्स ब्रेकमध्ये चहा नेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन करत होते.

याची खरी सुरुवात १८९९ साली झाली जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंड दौऱ्यावर होता जेव्हा कर्णधार जो डार्लिंग यांनी चहाची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार एक फॅशन म्हणून वाढला. १९०२ ते १९०५ या काळात जो डार्लिंग खेळत असताना हा प्रकार सुरूच होता.