जेव्हा ३४३ धावांचे लक्ष दिलेला संघ होतो ३५ धावांवर सर्वबाद

इंदौर येथे झालेल्या रणजी सामन्यात आंध्र प्रदेशने मध्य प्रदेशला 307 धावांनी पराभूत केले. या सामन्याच्या दुसऱ्या डावात मध्य प्रदेशला सर्वबाद 35 धावाच करता आल्या.

या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत आंध्रला 132 धावांवरच रोखले होते.

आंध्रच्याही गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत मध्यला 91 धावांवरच सर्वबाद केले. यामध्ये त्यांच्याकडून पी गिरीनाथ रेड्डीने 29 धावा देत सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. नंतर दुसऱ्या डावात त्यांचा फलंदाज के करण शिंदेने नाबाद 103 धावांची खेळी केली. यामुळे त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद 301 धावा करत मध्यला 343 धावांचे लक्ष्य दिले होते.

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही मध्यची सुरूवात वाईट झाली. त्यांनी 13 षटकांतच 3 गडी गमावत 35 धावा केल्या होत्या. मात्र 3.5 षटकाच्या फरकाने त्यांनी बाकीच्या 7 विकेट्स गमावत सामनाही गमावला.

मध्यच्या दुसऱ्या डावात आंध्रच्या केव्ही ससिकांतने 8 षटकांमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. शतकी खेळी करणारा करण शिंदेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या-

हरेंद्र सिंग यांची पुरूष हॉकी संघाच्या पदावरून गच्छंती

खेलो इंडिया- कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या प्रविण पाटीलचे सोनेरी यश

भविष्यात टीम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो बुमराह, पहा व्हीडिओ