आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यपालांकडून किदांबी श्रीकांतआणि प्रणॉयला शुभेच्छा

हैद्राबाद। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल एएसएल नरसिंह यांनी बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉयचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रीकांत आणि प्रणॉय आज हैद्राबाद राजभवनात राज्यपाल एएसएल नरसिंहना भेटले. तेव्हा एएसएल नरसिंह त्यांना म्हणाले सगळ्या देशाला तुमचा अभिमान वाटत आहे. त्याचबरोबर ते प्रणॉय शुभेच्छा देताना म्हणाले तो लवकरच जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये येईल. तसेच श्रीकांतसुद्धा अव्वल स्थानी येईल अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच त्यांनी देशाचे नाव उज्वल करा असे सांगितले आहे.

श्रीकांत सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमवारीत क्रमांकावर आहे, हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान आहे. तसेच त्याने या वर्षात ४ सुपर सिरीज विजेतेपदे मिळवले आहे. असे करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर प्रणॉयने क्रमवारीत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ११ वे स्थान मिळवले आहे.