आंद्रेस इनिएस्टाचा बार्सिलोनासोबत आजीवन करार

बार्सिलोनाच्या फुटबॉल इतिहासातील पहिलाच आजीवन करार

आंद्रेस इनिएस्टाने आज बार्सिलोना बरोबर आजीवन करार केला. मागील वर्षीचा इनिएस्टाचा खेळ पाहून खूप जाणकारांनी त्याने निवृत्ती घ्यवी असे सल्ले दिले होते. टीकाकारांनी तर इनिएस्टा संपला असे सुद्धा म्हटले पण या वर्षीच्या खेळाने इनिएस्टाने मात्र सगळ्यांना चोख उत्तर दिले. करारप्रसंगी बार्सिलोना संघाने इनिएस्टाला वेगळी जर्सी देत त्यावर आजीवन इनिएस्टा (‘Forever Iniesta’) असे लिहून दिले. 

वयाच्या १२ व्या वर्षी आजच ला मासियाच्या १४ वर्षाखालील बी संघाकडून त्याने पदार्पण केले. आणि १८ व्या वर्षी बार्सिलोनाकडून खेळण्यास सुरुवात केली. 

या कराराबद्दल ट्वीट करुन बार्सिलोनाने अधिकृत घोषणा केली.

करारवर सही केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इनिएस्टाने त्याचे याबद्दल व क्लब बद्दल स्वत:चे मनोगत व्यक्त केले. त्यातील काही ठळक गोष्टी:

१) हा माझ्यासाठी खूप विशेष दिवस आहे त्याचे कारण मी माझ्या घरी अजून खेळू शकतो आणि अजून जिंकायचे स्वप्न पाहू शकतो.
२) मी इथेच वाढलो आणि शिकलो हा माझा क्लब आहे इथे कर्णधार असणे अभिमानास्पद आहे. जोपर्यंत माझे शरीर आणि मन साथ देईल मी नक्की खेळेन.
३) या करारा मागे खूप त्याग आहे म्हणुन या बद्दल मला गर्व वाटतो. येणारी वर्ष मला इथे खेळायचे आहे पण भविष्यात काय होईल मी काय विचार करत असेल आत्ता सांगू शकत नाही.
४) मेस्सीला सुद्धा इथेच रहायचे आहे तो सुद्धा क्लब बरोबर पुढे जाईल अशी आशा करतो.
५) मी इथे १२ व्या वर्षी आलो आज ३३ वर्षाचा आहे हा सगळा प्रवास अर्वणनीय आहे.
६) भविष्यात काय ते ठरवले तर नाही पण फुटबाॅल बद्दलच असेल हा मात्र नक्की.

आपणास हे माहित नसेल तर:
# आंद्रेस इनिएस्टाने बार्सिलोना संघासोबत विक्रमी ३० विजेतेपदं पटकावली आहेत.
# लिओनेल मेस्सीने देखील इनिएस्टा सोबत ३० विजेतेपदं पटकावली आहेत.
# इनिएस्टाने बार्सिलोनाकडून ६३९ सामन्यात तब्बल ५५ गोल केले आहेत.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)