पॅट कमिन्सच्या जागी या खेळाडूला ऑस्ट्रेलिया टि२० संघात स्थान

आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेसाठी वेगवान गोलंदाज अँड्रयू टायला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले आहे. पॅट कमिन्सचा बदली खेळाडू म्हणून त्याला संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पॅट कमिन्सला आगामी अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी परत बोलावले आहे.

अँड्रयू टाय यावर्षी आयपीलमध्ये गुजरात लायन्स संघाकडून खेळत होता. त्याच दरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीनंतर तो संघात पुनरागमन करणार आहे. यावर्षीच्या आयपीलमध्ये त्याने राईझींग पुणे सुपरजायंट्स संघाविरुद्ध हॅट-ट्रिक घेतली होती.

आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ३ सामन्यांची टी २० मालिका ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे.

असे असेल टी २० सामन्यांचे वेळापत्रक:
पहिला सामना, ७ ऑक्टोबर, रांची
दुसरा सामना, १० ऑक्टोबर, गुवाहाटी
तिसरा सामना,१३ ऑक्टोबर, हैद्राबाद