विम्बल्डन: आजचे हे महत्त्वाचे सामने

0 59

विम्बल्डन २०१७ चा आजचा ७ वा दिवस आहे. प्रथेप्रमाणे काल पहिल्या रविवारी घेतलेल्या विश्रांतीनंतर विम्बल्डनच्या दुसऱ्या आणि अंतिम पर्वाला आज सुरुवात होणार आहे. यात आज टेनिस दिग्गजांचे सामने आहेत.

२०११ नंतर प्रथमच फॅब फोर म्हणून ओळखले जाणारे फेडरर, नदाल, जोकोविच आणि मरे हे शेवटच्या १६ खेळाडूंमध्ये आहेत. आज या चारही दिग्गजांचे सामने आहेत.

सेन्टर कोर्टवर अव्वल मानांकित अँडी मरेचा सामना हा बिगरमानांकीत फ्रान्सच्या बेनोईट पेअरशी होत आहे. हा सामना संपल्यावर तृतीय मानांकित आणि सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडरर बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हशी दोन हात करेल.

कोर्ट नंबर एकवर चतुर्थ मानांकित राफेल नदालचा सामना १६व्या मानांकित गिल्स मुल्लरशी होणार आहे. हा सामना संपल्यावर द्वितीय मानांकित नोवाक जोकोविचचा सामना एड्रियन मन्नारीनो या फ्रान्सच्या बिगरमानांकीत खेळाडूंशी होणार आहे.

महिला एकेरी :

चतुर्थ मानांकित व्हीनस विल्यम्सची लढत ही अ‍ॅना कोंजुह होणार आहे तर अग्र मानांकित अँजेलिक कर्बरचा सामना १४व्या मानांकित गर्बिन मुगुरुझाशी होणार आहे. व्हिक्टोरिया अजारेंकाचा सामना द्वितीय मानांकित सिमोना हॅलेपशी होत आहे.अन्य एकेरीच्या सामन्यात एलिना स्वितोलिनाची लढत येलेना ओस्तापेन्को होणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: