लोकल बाॅय अॅंडी मरेच्या विंबल्डन समावेशबाबत संभ्रम

पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या विंबल्डन स्पर्धेत अॅंडी मरेच्या समावेशबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हा खेळाडू पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या लिबेमा ओपनमध्ये कमबॅक करणार होता. परंतु त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

२००३ आणि २०१६ सालचा विंबल्डन विजेता मरे मात्र आपल्या २०१८च्या या स्पर्धेतील समावेशाबाबत आशावादी आहे. ३१ वर्षीय मरे गेल्यावर्षीच्या विंबल्डनपासुन कोणतीही स्पर्धा खेळला नाही.

मी सध्या कोणतीही स्पर्धा खेळण्यासाठी तयार नाही. मी जेव्हा पुर्ण फीट होईल तेव्हाच स्पर्धात्मक टेनिसमध्ये भाग घेईल असे तो म्हणाला.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंडमध्येच ग्रास कोर्टवर एटीपीची स्पर्धा होणार असुन त्यात मरे सहभागी होईल असे बोलले जात आहे.

यावर्षी विंबल्डन स्पर्धा २ ते १५ जुलै दरम्यान होणार आहे.