Australian Open 2018: मारिया शारापोवा स्पर्धेतून बाहेर

रशियाचे टेनिसपटू मारिया शारापोवाला तिसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. तिचा २१व्या मानांकित अंजेलिक कर्बरने ६-१, ६-३ असा पराभव केला

शारापोवा सध्या डब्लूटीए क्रमवारीत ६१व्या स्थानावर आहे. बंदीनंतर ती प्रथमच या स्पर्धेत खेळत असून २००८ साली ती ही स्पर्धा जिंकली होती.

कर्बरने या सामन्यात तब्बल ५वेळा शारापोवाची सर्विस भेदली. त्यामुळे शारापोवाला केवळ ६४ मिनिटांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

२०१६ची ऑस्ट्रेलियन ओपन विजेती कर्बर उपउपांत्यपूर्व फेरीत अग्निएस्का रडवानस्काबरोबर खेळेल