तिसरी कसोटी: पहिले सत्र लंकेच्या नावावर, मॅथ्यूजचे शतक

दिल्ली । येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात श्रीलंका संघाने तिसऱ्या दिवशी चांगली सुरुवात करताना पहिल्या सत्रात कोणतीही पडझड होऊ न देता ८३.३ षटकांत ३ बाद २२३ धावा केल्या आहेत. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने शतकी खेळी करताना २३५ चेंडूत १०४ धावा केल्या आहेत तर चंडिमल २०९ चेंडूत ६९ धावांवर खेळत आहे.

अँजेलो मॅथ्यूजला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून जीवदान मिळाले. या दोघांनीही यावेळी त्याचे झेल सोडले. मॅथ्यूजने तब्बल १९ कसोटीनंतर आणि २ वर्षांनी शतकी खेळी केली आहे. त्याचे हे कसोटीतील ८वे शतक आहे.

सध्या श्रीलंका ३१२ धावांनी पिछाडीवर आहे.