कोहली कुंबळे वाद चिघळणार

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद मिटण्याचं नाव घेत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यापूर्वी कोहलीने भारतीय क्रिकेट सल्लागार समितीसमोर कुंबळेबद्दल नाराजगी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आहेत. यामुळे या तिघांची समिती चांगलीच दुविधा स्थितीमध्ये आहे.
सूत्रांच्या हवाल्यानुसार या समितीबरोबर कोहलीची चर्चा सुरु असताना बीसीसीआयचे सेक्रेटरी अमिताभ चौधरी, सीईओ राहुल जौहरी आणि जनरल मॅनेजर एमवी श्रीधरसुद्धा उपस्थित होते.
कोहलीच्या म्हणण्याप्रमाणे कुंबळेच्या काम करण्याच्या पद्धतीशी जुवळुन घेणे अवघड आहे. त्यात त्यांच्यात निर्माण झालेली दरी आता भरून काढणे अवघड आहे.

यामुळे सल्लागार समिती दुविधा मनस्थितीत

सल्लागार समितीप्रमाणे कुंबळेने २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत प्रशिक्षक राहिले पाहिजे परंतु विराट कोहलीच कुंबळे बरोबर जुळवून घेणं आतातरी अशक्य आहे.