- Advertisement -

अनिल कुंबळेच्या वक्तव्यामुळे बीसीसीआय नाराज…

0 43

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने भारताच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारताच्या सहभागाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या अनिल कुंबळेनेही काहीस तसंच वक्तव्य केलं आहे.

 

हिंदुस्थान टाइम्समधील आलेल्या बातमीप्रमाणे कुंबळेच्या वक्तव्यात भारताच्या सहभागाबद्दल कुंबळे आशावादी आहे. भारताचा हा माजी कसोटी कर्णधार बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात  म्हणतो,” बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात उत्पन्नावरून सुरु असलेल्या वादाचा कोणताही परिणाम भारताच्या क्रिकेटवर होऊ नये. भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला पाहिजे.”

 

हिंदुस्थान टाइम्समशी बोलताना बीसीसीआय मधील एका जेष्ठ सदस्याने थेट अनिल कुंबळेच्या या वक्तव्यावर टीका केली. “बीसीसीआय ही एक संस्था आहे. त्यात सर्वजण मिळून निर्णय घेतात. कुंबळेने याबद्दल बीसीसीआयला भारताच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील सहभागाबद्दल पत्र लिहिले आहे. परंतु अनिल भाग घ्यावा अथवा नाही यात काहीही संबंध नाही. हा निर्णय पूर्णपणे बीसीसीआयचा असेल.” असे त्या जेष्ठ सदस्याने सांगितले.

Comments
Loading...
%d bloggers like this: