जाणून घ्या कोणत्या दिग्गजांना मिळाले बीसीसीआयकडून किती पैसे !

नवी दिल्ली: बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेसह अनेक दिग्गजांचे बाकी असलेले मानधन आज दिले. त्यात अनिल कुंबळेचे अंदाजे १ कोटीच्या आजसपासचे मानधन आज बीसीसीआयने दिले.

बीसीसीआयने आज त्याबद्दल आज अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती दिली. कुंबळेची मे आणि जून महिन्याची फी २५ लाख प्रतिमहिना प्रमाणे ४८.७५ लाख बीसीसीआयने दिले.

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला अंदाजे १ कोटी रुपये फी मानधन देण्यात आले. सध्या इशांत भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य नाही.

प्रत्येकी ४५ लाख रुपये हे भारतीय महिला संघातील सदस्यांना देण्यात आले. यावर्षी महिला संघाने आयसीसी विश्वचषकात अंतिम फेरी गाठली.

भारतीय क्रिकेटचे माजी दिग्गज विवेक राझदान, सरणदीप सिंग, सलील अंकोला, रीतींदर सोधी, योगराज सिंग आणि रॉबिन सिंग यांना एकवेळ दिल जाणार ३५ लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं आहे.