भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी सेहवागच नाव सर्वात पुढे

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच नाव भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचं बोललं जात आहे. आज कुंबळेने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यावर या गोष्टीची मोठी चर्चा आहे.

कुंबळेचा एक वर्षाचा कार्यकाळ आज संपल्यामुळे आज त्याने राजीनामा दिला. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी कुंबळेने अर्ज भरलेला आहे. कुंबळे प्रशिक्षक पदाच्या मुलाखतीत भाग घेणार किंवा नाही याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही.
विराट कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली दरीच कुंबळेचा राजीनामा देण्यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. गेल्या २-३ महिन्यापासून हे वाद मोठ्या प्रमाणावर चर्चिले जात होते. खेळाडू तसेच प्रशिक्षक यांच्यासाठी वेतनवाढ हवी ही कुंबळेने घेतलेली भूमिकासुद्धा बीसीसीआय खटल्याचं बोललं जात आहे.

त्यातच बीसीसीआयकडून वीरेंद्र सेहवागला अर्ज करण्यासाठी बोललं गेल्याची बातमीही काही दिवसांपूर्वी आली होती.त्यात हा अर्ज सेहवागने फक्त २ ओळींचा केल्यामुळे त्याला तो परत करायला लावला होता.

आज कुंबळे भारतीय संघाबरोबर रवाना न होता आयसीसीच्या मीटिंगसाठी लंडन येथेच थांबला आहे. भारतीय संघाचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना २३ जून रोजी होत आहे.