वाढदिवसाच्याच दिवशी कुंबळेने केले विराटला टॅग

भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आज (17 आॅक्टोबर) 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी तसेच अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याला राज्यसभेचे सदस्य आरके सिन्हा यांनीही ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देताना कुंबळेचा एक फोटोही शेअर केला होता. या फोटोमध्ये त्यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी, बबिता फोगट, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग या खेळाडूंनाही टॅग केले आहे.

त्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानताना कुंबळेकडून विराटलाही टॅग करण्यात आले आहे.

कुंबळे आणि विराटमधील संबंध मागीलवर्षी बिघडले होते. त्यामुळे विराटने कुंबळेला प्रशिक्षकपदावरुन हटवण्याचीही मागणी केली होती. या प्रकरणामुळे कुंबळेने जून 2017 मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

कुंबळेनंतर रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

या प्रकरणानंतर विराटने मागील वर्षी कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्यामुळे अनेकांनी विराटला सोशल मिडियावर ट्रोल केले होते. पण विराटने यावर्षीही कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहित.

महत्त्वाच्या बातम्या:

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

कॅच तर रोहित शर्माने अप्रतिम घेतला परंतु या कारणामुळे झाला मोठा वाद

कसोटीपाठोपाठ पृथ्वी शाॅची वनडेतही धमाकेदार खेळी, चौकार- षटकारांची बरसात