प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेल्या कुंबळेलाच मिळाला यावर्षीचा सर्वोत्तम प्रशिक्षक पदाचा पुरस्कार

भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक आणि माजी कर्णधार अनिल कुंबळेला बेंगलोरच्या क्रीडा पत्रकार असोशिएशनकडून दिला जाणारा ‘कोच ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.

२०१७ यावर्षासाठीचा बेंगलोरच्या क्रीडा पत्रकार असोशिएशन (Sports Writers Association of Bangalore (SWAB)) कडून दिला जाणारा हा पुरस्काराचा कुंबळे मानकरी ठरला आहे.

अनिल कुंबळेने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सोडले आहेत.

यावेळी पुरस्कार सोहळ्यानंतर अनिल कुंबळेने माध्यमांशी बोलताना कर्णधार कोहलीच्या टीम इंडियाचे जोरदार कौतूक केले.