अनिल कुंबळेची गुगली: विराट कोहलीला कर्णधार म्हणून वेगळं मानधन मिळालं पाहिजे!

भारतीय क्रिकेट संघाचा राष्ट्रीय प्रशिक्षक अनिल कुंबळे आजकाल खेळाडू आणि प्रशिक्षक यांना दिलेल्या मानधनावरून रोज चर्चेत आहे. आता या मानधनाच्या बाबीत कुंबळेने नवीनच अट टाकली आहे. त्यात कुंबळेच म्हणणं आहे कि राष्ट्रीय टीमचा कर्णधाराला बाकी खेळाडूंपेक्षा २५% रक्कम जास्त मिळावी पाहिजे.

टाइम्स इंडियामधील वृत्तानुसार कुंबळे पुढे म्हणतो की निवड समितीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षकाची निवड समितीमध्ये कायमस्वरूपी जागा असावी. कारण प्रशिक्षकाला नक्की माहित असते की कोणता खेळाडू चांगला लयीत आहे. कोण दुखापतग्रस्त आहे? त्यामुळे त्याची मत विचारात घेण्यासाठी त्याला कायमस्वरूपी जागा असावी.

कुंबळेच्या म्हणण्याप्रमाणे दरवर्षी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मानधनात १०% वाढ व्हावी.

जर कर्णधार म्हणून मानधनात वाढ झाली तर कोहलीला आणखी १ कोटी २५ लाख रुपये मिळतील. सध्या त्याला मिळणारी रक्कम ५ कोटी आहे.

बीसीसीआयच्या श्रेणीनुसार दिल्या जाणाऱ्या मानधनात अ श्रेणीतील खेळाडूंना २ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी तर क श्रेणीतील खेळाडूंना ५० लाख रुपये दिले जातात. याशिवाय १५ लाख कसोटी सामन्यासाठी, ७ लाख एकदिवसीय सामन्यासाठी तर ३ लाख टी२० सामन्यासाठी दिले जातात.