फलंदाजांसाठी गोलंदाज अनिल कुंबळेने केली जगातील सर्वात भारी गोष्ट

एखाद्या गोष्टीची माणसाला मनापासून आवड असली की तो त्याच क्षेत्राताली नविन गोष्टींचा शोध घेत आपले कार्य पुढे नेत असतो. असंच झालंय भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुबंळे सोबत.

अनिल कुंबळेचा स्टार्टअप असलेली कंपनी स्पेक्टाकाॅम टेक्नाॅलाॅजीजने गुरूवारी (11 आॅक्टोबर) “पाॅवर बॅटचे” अनावरण केले आहे. या बॅटमध्येे मायक्रोसाॅफ्ट्सचे अझूरे क्लाउड वापरले आहे. त्यामध्ये अर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)  आणि इंटरनेट आॅफ थिंग्स हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.

ह्या पाॅवर बॅटमध्ये रिअल टाईम डाटा आणि खेळाडूंच्या कामगिरीनुसार वेगवेगळे पॅरामिटर देण्यात आले आहेत. त्यामधे कोणत्या चेंडूचा परिणाम कसा झाला, त्याचबरोबर फटक्याच्या गुणवत्ता काय होती हे सर्व दाखवण्यात आले आहे.

“चाहत्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खेळाच्या जवळ नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या उपकरणाद्वारे आपल्याला चालू क्षणातील आकडेवारी पाहता येईल. या उपकरणाला कुल्याही प्रकारचा जोड नसून, खेळात कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही.” असे अनिल कुबंळेने अनावरणाच्या क्रार्यक्रमात सांगितले.

“माक्रोसाॅफ्टसोबतीने आम्ही सुरक्षित आणि योग्य पर्याय दिला आहे. स्टार इंडिया या मिडिया पार्टनरमुळे या उपकरणाच्या चाहत्यांची संख्या वाढणार आहे.” असेही कुंबळेने सांगितले.

प्रशिक्षण घेताना किंवा सराव करताना उपकरणातील माहिती मोबाईल अॅपमधूनही पाहता येणार आहे.

Spektacom नावाचे एक नविन तंत्रज्ञान अनिल कुंबळेच्या कंपनीने तयार केले आहे. जे दिसायला स्टिकरसारखे असुन बॅटच्या वरच्या भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे फलंदाजाने एखादा फटका किती ताकदीने मारला आहे तसेच त्याला त्याने तो कोणत्या भागातून मारला आहे हे मोबाईल अॅपच्या माध्यमातून समजणार आहे.

याचा वापर देशातंर्गत क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या तामिळानाडू प्रीमियर लीगमध्ये यापुर्वीच वापरण्यात आली आहे.

कुंबळेच्या कंपनीचे हे तंत्रज्ञान विकसीत केले असून यापाठीमागे मायक्रोसाॅफ्ट टेकचा मोठा हातभार आहे. ही स्मार्ट चीप जेव्हा बॅटवर बसवली जाईल तेव्हा ती बॅट ‘स्मार्ट बॅट’ म्हणुन ओळखली जाईल, असा दावा भारताकडून एकाच डावात कसोटीत १० विकेट्स घेणाऱ्या या माजी गोलंदाजाने जूनमध्येच केला होता.

महत्वाच्या बातम्या-