वय- १५ वर्ष, कामगिरी- राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, नाव- अनिश भनवाला

0 95

गोल्ड कोस्ट । १५ वर्षीय अनिश भनवालाने २१व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात ही कामगिरी केली आहे.

त्याने या प्रकारात विक्रमी ३० गुण मिळवत ही कामगिरी केली. विशेष म्हणजे हे पदक जिंकताना त्याने राष्टकूल स्पर्धेत या प्रकारात विक्रमी गुण घेतले आहेत.

२८ गुणांसह ऑस्ट्रेलियाच्या सर्जई इवग्लेवस्की दुसऱ्या क्रमांकावार राहिला तर इंग्लंडचा सॅम गोविन हा १७ गुण घेत कांस्यपदक पटकावले.

अनिश राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या अनिशने सुवर्णपदकाचा अचूक वेध घेत मोठी कामगिरी केली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: