- Advertisement -

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताच्या नेमबाजांचा पदकांचा धडाका सुरु; अंकुर मित्तलने जिंकले कांस्यपदक

0 114

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आजच्या दिवसात नेमबाजीमधील दुसरे पदक मिळाले आहे. आज भारताचा नेमबाज अंकुर मित्तलने पुरुष डबल ट्रॅप प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.

यामुळे आता भारताच्या पदकांची संख्या २४ झाली आहे. यात १२ सुवर्ण, ४ रौप्य आणि ८ कांस्य पादकांचा समावेश आहे.

मित्तलने अंतिम फेरीत ५३ पॉईंट्स मिळवत त्याचे कांस्य पदक निश्चित केले होते. तर ७४ पॉइंट्सची कमाई करत स्कॉटलंडच्या डेविड मेक्मेथने सुवर्णपदक आणि आइल ऑफ मॅनच्या टीम निलने ७० पॉईंट मिळवत रौप्य पदक मिळवले.

त्याचबरोबर भारताचाच अशब मोहदला मात्र ४३ पॉईंट्ससह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्याने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. मात्र यावर्षी त्याला पदक मिळवण्यात अपयश आले आहे.

मित्तल २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिला होता.

त्याने मागच्यावर्षी मात्र यश मिळवताना विश्वविजेतेपद स्पर्धेत रौप्य पदक तर आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक मिळवले होते.

Comments
Loading...
%d bloggers like this: