उर्वरित वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन मोठे बदल

मुंबई | भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील ५ सामन्यांच्या वन-डे मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा आज करण्यात आली. यात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी संघात कमबॅक केले आहे.

पहिल्या दोन सामन्यांसाठी १४ खेळाडूंना निवडण्यात आले होते तर यावेळी संघ १५ खेळाडूंचा आहे. त्यात मोहम्मद शमीला वगळण्यात आले आहे.

तिसरा वनडे सामना पुणे, चौथा मुंबई तर पाचवा तिरुअनंतपुरमला होणार आहे.

पृथ्वी शाॅला मात्र वन-डे पदार्पणासाठी वाट पहावी लागणार आहे.

अशी आहे उर्वरित मालिकेसाठी टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव. युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, केएल राहुल, मनीष पांडे

महत्त्वाच्या बातम्या- 

क्रिकेट इतिहासातील सर्वात दिग्गज कर्णधाराचे विक्रम विराटने किरकोळीत मोडले

१० हजार धावा करताना सचिन-कोहलीबरोबर घडले हे ५ खास योगायोग

७२ तासातच विराट कोहलीने मो़डला रोहित शर्माचा विक्रम