- Advertisement -

महिला विश्वचषक: उपांत्य फेरीपाठोपाठ अंतिम फेरीतही हरमनप्रीत कौरचा धमाका सुरूच

0 92

महिला विश्वचषक उपांत्य फेरीत जबदस्त दीडशतकी खेळी करून भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरने हा धडाका अंतिम फेरीतही कायम ठेवला आहे. आज अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळताना तिने नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे.

सलामीवीर पूनम राऊतला चांगली साथ देत तिने ही खेळी केली आहे. यात तिने ३ चौकार आणि २ खणखणीत षटकार खेचले आहेत.
या अर्धशतकी खेळीसाठी तिने ७८ चेंडूंचा सामना केला. सध्या भारत १३६ धावांवर २ बाद अशा सुस्थितीत आहे. भारताला सध्या १७ षटकात ९३ धावांची गरज असून ८ विकेट्स हातात आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: