वीरेंद्र सेहेवागने हा फोटो शेअर करून दिल्या शिखर धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

दिल्ली । भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक वीरेंद्र सेहवागच्या त्याच्या हटके ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. विशेषकरून कोणत्या क्रिकेटपटूचा वाढदिवस असेल तर सेहवाग आपल्या खास अंदाजात त्याला शुभेच्छा देतो.

आजही आपला ३२ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या शिखर धवनला शुभेच्छा देताना वीरेंद्र सेहवागने शिखर हुबेहूब दिसणाऱ्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो केला आहे.

शुभेच्छांमध्ये सेहवाग म्हणतो, ” हॅपी बर्थडे शिखा. असे तुला इंग्रजी समालोचक म्हणतात.तू असा एकमेव असशील जो संघाची गरज असताना संकटातून सुटका करतो तसेच अनेक विजयाची पायाभरणी करतोस. “