समस्तीपूरच्या रवींद्र जडेजाचा अंडर १९ विश्वचषकात बोलबाला

समस्तीपूरचा जडेजा म्हणून ओळख निर्माण केलेल्या अनुकूल रॉयने आज विश्वचषकात एक खास विक्रम केला आहे. १९ वर्षाखालील विश्वचषकात यावेळी सर्वाधिक विकेट्स घेणारा तो खेळाडू ठरला आहे.

त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात १ विकेट आणि ६ धावा, पीएनजीविरुद्ध ५ विकेट्स, झिम्बाब्वेविरुद्ध ४ विकेट्स, बांगलादेशविरुद्ध १ विकेट आणि २ धावा, पाकिस्तान विरुद्ध १ विकेट आणि ३३ धावा तर आज २ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने ६ सामन्यात एकूण १४विकेट्स घेतल्या असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज या विश्वचषकात ठरला आहे.

१९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय गोलंदाजाने सार्वधिक विकेट घेणाऱ्या यादीत अव्वल येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर भारताने ६ पैकी ६ सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना सर्वबाद केले आहे.