अनुपच्या नावे झाला हा नवीन विक्रम

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या सुरुवात काल २८ जुलै रोजी हैद्राबाद येथे झाली. पहिला सामना तेलगू टायटन्स आणि तमिळ थलाईवाज यांच्यात झला. तेलगू टायटन्स संघाने हा सामना जिंकला. दुसरा सामना यु मुंबा आणि पुणेरी पलटण या महाराष्ट्रातील दोन संघात झाला आणि पुणेरी पलटणने हा सामना एकतर्फी जिंकला.
मुंबाचे रेडर काशीलिंग आडके, शब्बीर बापू आणि नितीन मदने रेडींगमध्ये कमाल करू शकले नाहीत. रेडींगमधील अपयश आणि डिफेन्समधील चुकांमुळे यु मुंबाला हा सामना गमवावा लागला. पण यु मुंबाचा कर्णधार असणाऱ्या अनुपच्या नावे या सामन्यात नवीन विक्रम झाला.
अनुप कुमार प्रो कबड्डीच्या इतिहासात ५०० एम्प्टी रेड करणारा पहिला खेळाडू ठरला. दुसऱ्या आणि तिसऱ्या मोसमात अनुपच्या एम्प्टी रेड टाकण्याच्या नवीन प्रयोगाने मुंबा संघाला खूप फायदा झाला होता.
मागील मोसमापर्यंत अनुपच्या नावावर ४९६ एम्प्टी रेड झाल्या होत्या. काल त्याने ४ एम्प्टी रेड केल्या आणि आता त्या एम्प्टी रेडची संख्या ५०२ वर गेली आहे. अनुप हा प्रो कबड्डीमधील दुसरा सर्वात यशस्वी रेडर आहे. काल यु मुंबाचा संघ लयीत येऊ शकला नसला तरीही ते परत दिमाखदार पुनरागमन करतील अशी आशा आहे.