प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा अनुप कुमार सहावा खेळाडू

पुणे। प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात शुक्रवारी(19 आॅक्टोबर) पटना पायरेट्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात पटना पायरेट्सने 41-30 अशा फरकाने विजय मिळवला.

या सामन्यात जयपूर पिंक पँथरला पराभवाचा सामना जरी करावा लागला असला तरी त्यांचा कर्णधार अनुप कुमारने एक खास विक्रम केला आहे.

त्याने प्रो कबड्डीमध्ये 500 रेड पॉइंट्स घेणारा तो एकूण सहावा कबड्डीपटू ठरला आहे. त्याने त्याचे 82 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे. या सामन्यात त्याने एकूण 8 पॉइंट्स घेतले. त्यामुळे आता त्याचे 506 रेड पॉइंट्स झाले आहेत.

या आधी प्रो कबड्डीमध्ये 500 रेड पॉइंट्स पूर्ण करण्याचा टप्पा राहुल चौधरी, प्रदीप नरवाल, अजय ठाकुर, दीपक निवास हुडा आणि काशिलिंग अडके या पाच रेडर्सने केली आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स घेणारे कबड्डीपटू:

700 – राहुल चौधरी (सामने – 84)

682 – प्रदीप नरवाल (सामने – 69)

616 – अजय ठाकुर (सामने – 88)

532 – दीपक निवास हुडा (सामने – 85)

518 – काशिलिंग अडके (सामने – 76)

506 – अनुप कुमार (सामने – 82)

महत्त्वाच्या बातम्या

रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूचे कसोटी संघात पुनरागमन; आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

निवड समितीने दाखवला धोनीला घरचा रस्ता, टीम इंडियातून पहिल्यांदाच वगळले

Video: एकच ग्लोव्हज घालून फलंदाजीला आला हा फलंदाज; पुढे काय झाले ते पहाच