कॅप्टन कूल अनुप कुमारचा कबड्डीला अलविदा

पंचकुला | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रो कबड्डीतील जयपुर पिंक पॅंथरचा कर्णधार अनुप कुमारने पंचकुला लेगमध्ये कबड्डीला अलविदा केले आहे.

जयपुर पिंक पॅंथरचा होम लेग या हंगामात जयपुरवरुन पंचकुला, हरियाणाला हलविण्यात आला आहे. स्टेडियमच्या अनउपलब्धतेमुळे हे सामने हलविण्यात आले आहेत.

त्याच्या निवृत्तीची घोषणा पिंक पॅंथरच्या ट्विटर हँडेलवरुन करण्यात आली आहे. त्यांनी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुप कुमारने तो कबड्डीमधून निवृत्ती घोषित करत असल्याचे सांगितले आहे.

तसेच त्याच्या मुलाचा आज(18 डिसेंबर) वाढदिवस असून याच दिवशी तो कबड्डीमधून निवृत्ती घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या कुटुंबाचे आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

या लेगमध्ये अनुप दुखापतीमुळे खेळलेला नाही. त्यामुळे त्याला घरच्या प्रेक्षकांसमोर निवृत्तीचा सामना खेळता आलेला नाही. अनुप मुळचा पार्ला, हरियाणा येथील असून पंचकुलाचे स्टेडियम अनुपच्या घरापासून केवळ २७८ किलोमीटर अंतरावर आहे.

या हंगामात जयपुर पिंक पॅंथरला विशेष चमक दाखवता आली नाही. त्यात संघ अ गटात 6 विजय आणि 11 पराभवांसह 5 व्या स्थानी आहे. त्यात एक वेळ ही स्पर्धा गाजवलेला भारताचा हा कॅप्टन कूल कठीण परिस्थितीतून जात होता.

अनुपने या हंगामात 13 सामन्यात 50 गुण घेत 47व्या स्थानावर आहे. त्यात जयपुरचा अष्टपैलू खेळाडू दिपक निवास हुडा आणि अनुपमधील वाद चव्हाट्यावर आलेले प्रेक्षकांनी लीगमध्ये पाहिले. या दोन खेळाडूंमध्ये चालु सामन्यातही अनेक वेळा विसंवाद घडला आहे.

नुकत्याच झालेल्या एशियन गेम्स तसेच कबड्डी मास्टर्स स्पर्धेत त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यात अनुप गेल्या हंगामापासून तितकासा फिट वाटला नाही.

अनुप कुमारने प्रो कबड्डीत आजपर्यंत 91 सामन्यात 596 गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो ६व्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन

७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं

माझं धोनीबद्दलचं मत कधीच बदलणार नाही- गौतम गंभीर