कॅप्टन कूल अनुप कुमार करणार प्रो कबड्डीला अलविदा?

पंचकुला | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रो कबड्डीतील जयपुर पिंक पॅंथरचा कर्णधार पंचकुला लेगमध्ये प्रो-कबड्डीला  अलविदा करण्याची शक्यता आहे.

जयपुर पिंक पॅंथरचा होम लेग या हंगामात जयपुरवरुन पंचकुला, हरियाणाला हलविण्यात आला आहे. स्टेडियमच्या अनउपलब्धतेमुळे हे सामने हलविण्यात आले आहेत.

महा स्पोर्ट्सला कबड्डी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुप यापुढे प्रो कबड्डीत कर्णधार तसेच खेळाडू म्हणुन खेळण्यास उत्सुक नाही. तसेच तो पंचकुलाला लीगमधील आपला शेवटचा सामना घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी उत्सुक आहे.

पंचकुला लेगमध्ये जयपुर एकूण ६ सामने खेळणार असून शेवटचा सामना २० डिसेंबर रोजी होणार आहे. जयपुर प्रो कबड्डीत जवळपास बाहेर गेल्यात जमा आहे. तसेच त्यांचा शेवटचा साखळी सामना २७ डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. तसेच पंचकुला लेगनंतर जयपुर केवळ एकच साखळी सामना खेळणार असल्यामुळे अनुप शेवटचा सामना पंचकुला येथे खेळू शकतो.

अनुप मुळचा पार्ला, हरियाणा येथील असून पंचकुलाचे स्टेडियम अनुपच्या घरापासून केवळ २७८ किलोमीटर अंतरावर आहे.

या निवृत्तीनंतर आॅल इंडिया पोलिस दलातील स्पर्धा मात्र खेळण्याची शक्यता आहे.

या हंगामात जयपुर पिंक पॅंथरला विशेष चमक दाखवता आली नाही. त्यात संघ अ गटात ३ विजय आणि ८ पराभवांसह शेवटच्या स्थानी आहे. त्यात एक वेळ ही स्पर्धा गाजवलेला भारताचा हा कॅप्टन कूल कठीण परिस्थितीतून जात आहे.

अनुपने या हंगामात १२ सामन्यात ४७ गुण घेत ३३व्या स्थानावर आहे. त्यात जयपुरचा अष्टपैलू खेळाडू दिपक निवास हुडा आणि अनुपमधील वाद चव्हाट्यावर आलेले प्रेक्षकांनी लीगमध्ये पाहिले. या दोन खेळाडूंमध्ये चालु सामन्यातही अनेक वेळा विसंवाद घडला आहे.

नुकत्याच झालेल्या एशियन गेम्स तसेच कबड्डी मास्टर्स स्पर्धेत त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यात अनुप गेल्या हंगामापासून तितकासा फिट वाटला नाही. त्यामुळे पंचकुला लेगवर तमाम कबड्डीप्रेमींचे आता लक्ष लागले आहे.

अनुप कुमारने प्रो कबड्डीत आजपर्यंत ९० सामन्यात ५९३ गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो ६व्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित

टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर

२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघातील या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम

हॉकी विश्वचषक २०१८: आज चीन समोर असणार बलाढ्य इंग्लंडला रोखण्याचे आव्हान