प्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान

आज(22 जूलै) प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सहावा सामना पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टिलर्स संघात हैद्राबाद येथे पार पडणार आहे. या सामन्याला रात्री 8.30 वाजता सुरुवात होईल. प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमातील या दोन्ही संघांचा आजचा पहिलाच सामना आहे.

आत्तापर्यंत या दोन संघात 6 सामने झाले असून पुणेरी पलटनने 5 वेळा बाजी मारली आहे. तर हरियाणाला पुण्याविरुद्ध 1 विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे आज पुण्याचा संघ हरियाणावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. तर हरियाणा संघ पुण्याची विजयाची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करतील.

या मोसमात दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक नवे आहेत. पुण्याचे कर्णधारपद या मोसमात सुरजित सिंग सांभाळत आहे. तर प्रशिक्षकपदी भारताचा माजी कर्णधार अनुप कुमार आहे. तसेच हरियाणाचे नेतृत्व अनुभवी कबड्डीपटू धर्मराज चेरलाथन करत असून प्रशिक्षकपदी भारताचा दिग्गज माजी कबड्डीपटू राकेश कुमार आहे.

त्यामुळे आता या नव्या कर्णधार-प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही संघ या मोसमात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विशेष म्हणजे दोन्ही संघांचे प्रशिक्षक अनुप कुमार आणि रोकेश कुमार हे प्रो-कबड्डीच्या चौथ्या मोसमात यू मुम्बा संघाकडून एकत्र खेळलेले आहेत. तसेच एकवेळी भारताच्या संघाकडूनही हे दोघे एकत्र खेळले असून भारताच्या दिग्गज कबड्डीपटूंमध्ये या दोघांचीही गणना होते.

त्याचबरोबर हे दोघेही पहिल्यांदाच प्रशिक्षकांच्या भुमिकेत चाहत्यांना या मोसमात पहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणाची रणनीती प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

विश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही

मराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस