शनिवारीच झाले विराट अनुष्काचे लग्न? मुंबईत होणार स्वागत समारंभ

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातमीची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. पण फिल्मफेअरनुसार त्यांचे लग्न ९ डिसेंबरलाच झाले असल्याचे समजते.

अनुष्का आणि विराटने इटलीतील मिलान शहरात त्यांचे लग्न केल्याची बातमी आहे. या सेलिब्रेटी जोडीच्या लग्नाची चर्चा जेव्हा विराटने श्रीलंका विरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती घेतली होती, तेव्हापासून रंगली आहे.

तसेच अनुष्का मुंबईहून आपल्या कुटुंबासमवेत इटलीला गेली असल्याचे समजले होते. तसेच यांच्या लग्नासाठी निमंत्रित पाहुण्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अमीर खान आणि शाहरुख खान यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच २२ डिसेंबरला मुंबईत रिसेपशन असण्याचीही शक्यता आहे.

विराट आणि अनुष्का हे २०१३ पासून डेटिंग करत असून त्यांची ओळख एका जाहिरात शूटच्या वेळी झाली होती. विराट आणि अनुष्का आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा आज रात्री ८ वाजता करणार आहे असे फिल्मफेअरने म्हटले आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार २१ डिसेंबरला विराट अनुष्का आपल्या लग्नाचे मुंबईत रिसेपशन देणार आहे.