विराट अनुष्का लग्नासाठी इटलीला रवाना ??

सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. त्यात अनुष्का इटलीला जात असल्याचे कळल्याने या चर्चेने जोर पकडला आहे.

काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्का इटलीत लग्न करणार असल्याची बातमी पसरली होती परंतु अनुष्का शर्माच्या मॅनेजरने हि अफवा असल्याचे सांगितले होते.

परंतु काल विराट आणि अनुष्का हे दोघेही इटलीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा हे दोघे इटलीला लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

अनुष्का तिच्या कुटुंबासमवेत इटलीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दिसून आली. त्याचबरोबर विराटही काल रात्री दिल्ली विमानतळावरून इटलीला गेला त्यावेळी त्याने जॅकेट घातले होते तसेच कोणी ओळखू नये म्हणून अर्धा चेहरा झाकला होता.

त्याचबरोबर सूत्रांकडून असे कळले आहे की विराटच्या कुटुंबाने आणि त्याच्या जवळच्या मित्रांनी आधीच इटलीच्या मिलान शहराची तिकिटे आरक्षित करून ठेवली आहेत. तसेच विराटाचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी देखील सुट्टी घेतली आहे.