विराट कोहलीने प्रसिद्ध केला अनुष्का बरोबरचा खास फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हा वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. बाकी भारतीय खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रकानानंतर विश्रांती घ्यायला प्राधान्य दिले असताना विराटने मात्र प्रेयसी अनुष्कासोबत विदेशात सुट्ट्यांचा आनंद घेण्याला प्राधान्य दिले आहे.

काल सोशल मीडियावर विराट- अनुष्काचे बरेच फोटो व्हायरल झाल्यानंतर विराटने आज स्वतःच अनुष्का बरोबरचा फोटो इंस्टाग्रामवर टाकला आहे.  व्यस्त वेळापत्रकानंतर अतिशय गरजेची असलेली विश्रांती असा टॅग याला विराटने दिला आहे.

View this post on Instagram

Much needed break with my ❤

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

तसेच अनुष्काने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे परंतु अनुष्काच्या फोटोमध्ये विराट दिसत नाही.

विशेष म्हणजे विराटचा इंस्टाग्राम डीपी हा सुद्धा अनुष्का बरोबर आहे.