तर तुम्हीही होऊ शकता भारतीय संघाचे प्रशिक्षक!

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याने राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने नव्याने अर्ज मागवले आहेत. त्याची शेवटची मुदत ही वाढवून ९जुलै करण्यात आली आहे.

कोहली आणि कुंबळे यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच या पदावर कोणाला निवडल जाणार याबद्दल सर्वसामान्य भारतीय क्रिकेटप्रेमींपासून ते संपूर्ण क्रिकेट जगताच लक्ष लागलं आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी नक्की काय पात्रता असते हे आज एका इंजिनिअरने या पदासाठी अर्ज केल्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं.

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी (अर्ज करण्यासाठी )  मुख्य अटी या बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर दिल्या आहेत. ह्या अटी पूर्ण केल्यांनतर त्यातून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना मुलाखत आणि प्रेसेंटेशनसाठी भारतीय क्रिकेट सल्लागार समितीला सामोरे जावे लागेल. ( ज्या समितीमध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांचा समावेश आहे .)
जर आपण या अटी पूर्ण करत असाल तर आपणही या पदासाठी अर्ज करू शकता.

#१ तुम्ही आयसीसीचे सदस्य असलेल्या देशाच्या प्रथम श्रेणी किंवा आंतरारराष्ट्रीय संघाला यशस्वीपणे प्रशिक्षण दिलेलं असावं

#२ आयसीसीच्या सदस्य देशांनी आयोजित केलेलया प्रशिक्षण कार्यक्रमाचे सर्टिफिकेट असणाऱ्या आणि त्याची मुदत न संपलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिल जाईल

#३ प्रशिक्षक म्हणून त्याच्याकडे भारतीय संघाला पुढे नेण्याचा तसेच प्रशिक्षण राबवण्याचा ठोस कार्यक्रम असावा. त्यामुळे भारतीय संघ तीनही प्रकारात चांगली कामगिरी करू शकेल.

#४ ठोस असा कृतिशील कार्यक्रम त्याच्याकडे असावा ज्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरीचं योग्य मूल्यमापन होईल. तसेच याचा सर्व फीडबॅक भारतीय क्रिकेट बोर्डाला वेळोवेळी देणारा तो अर्जदार असावा.

#५ त्याच्याकडे संवाद साधण्याचं कौशल्य असावं जेणेकरून खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात योग्य संवाद राहून योग्य संदेश जाईल. इंग्रजी भाषा उत्तम असावी. हिंदी भाषा आणि अन्य भारतीय भाषा येत असेल तर प्राधान्य दिल जाईल.

#६ तो नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारा असावा. त्यात खेळावरील नवनवीन सॉफ्टवेअर हाताळण्याची आणि त्याचा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी वापर करायची क्षमता असावी. जेणेकरून खेळाडूंच्या कामगिरीचं योग्य मूल्यमापन होईल.

#६ तो मल्टीटास्किंग असावा. त्याने जास्त काम करण्याची क्षमता ठेवावी.
#७ अर्जदाच चरित्र हे स्वच्छ असावं. त्याच्यावर यापूर्वी किंवा आता कोणताही गुन्हा नसावा. त्याचे कोणत्याही बीसीसीआय किंवा आयसीसी सदस्यांशी वैयक्तिक वाद नसावेत.

#८ भारतीय संघाच्या बेंगलोर येथील एनसीए येथे मार्गदर्शन करायची त्याची तयारी असावी. नवीन क्रिकेटपटू घडविण्याची क्षमता असावी.

(सूचना: प्रशिक्षक पात्रतेची अधिकृत माहिती ही बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. हे बीसीसीआयच्या भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी पात्रतेचे नियम असून त्यांचं बीसीसीआयच्या संकेतस्थळावरून भाषांतर केले आहे. त्यामुळे चुका असू शकतात. )