एशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताकडून नेमबाज अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांनी कांस्यपदक जिंकले आहे. त्या दोघांनी १० मीटर एयर रायफल मिश्र संघात हे पदक मिळवले. यावेळी या दोघांनी ४२९.९ गुण मिळवले.

तर १० मीटर पिस्तुल मिश्र गटात मनु भाकेर आणि अभिषेक वर्मा यांची निराशा झाली. हे दोघे अंतिम फेरीत पोहचण्यात थोडक्यात चुकले.

स्वीमिंगच्या २०० मीटर बटरपफ्लाय प्रकारात सज्जन प्रकाश अंतिम फेरीत पोहचला आहे. तसेच कबड्डीत भारतीय महिलांनी जपानचा ४३-१२ तर पुरूष संघाने बांगलादेशचा ५०-२१ असा पराभव करत धडाक्यात सुरूवात केली आहे.

या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक चीनला मिळाले. त्यांच्या सुन पेइयुआनने पुरूषांच्या चांगकुआनमध्ये ९.७५ गुण मिळवत हे पदक पटकावले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…

इंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा