पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ; या खेळाडूला मिळाली पहिल्यांदाच संधी

1 ऑगस्टपासून 71 व्या ऍशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा 14 जणांचा संघ आज जाहिर झाला आहे. हा सामना बर्मिंगहॅमला एजबस्टर्न स्टेडीयमवर होणार आहे.

इंग्लंडच्या कसोटी संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. आर्चरने 2019 विश्वचषकात 11 सामन्यात 20 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले होते.

त्याचबरोबर इंग्लंडने पुन्हा एकदा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या ब्रिस्टोल नाईट क्लब मारामारी प्रकरणानंतर स्टोक्सकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्याच्याऐवजी जॉस बटलरला उपकर्णधार केले होते. पण आता पुन्हा स्टोक्सला उपकर्णधार करण्यात आले आहे.

तसेच दुखापतीनंतर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडच्या संघात पुनरागमन केले आहे. तर आयर्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विश्रांती दिलेल्या बटलरचाही या संघात समावेश केला आहे. या संघाचे कर्णधारपद जो रुट सांभाळेल.

असा आहे पहिल्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडचा संघ – 

जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, सॅम करन, जो डेन्ली, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स, ऑली स्टोन.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

गौतम गंभीरने केले एमएस धोनीचे कौतुक, जाणून घ्या कारण

ठरंल! हे तीन दिग्गज करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड

टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या १४ खेळाडूंचा झाला विंडीजच्या संघात समावेश