विंडीजचा हा गोलंदाज इंग्लंड संघाकडून खेळण्यास सज्ज, विश्वचषकाचेही स्वप्न होऊ शकते पूर्ण

19 वर्षांखालील विंडिज संघाकडून खेळलेला मध्यमगती गोलंदाज जोफ्रा आर्चर पुढीलवर्षी इंग्लंड संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाकडून खेळण्यासाठी बदललेल्या पात्रता निकषामुळे तो इंग्लंडकडून मार्च 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या नवीन पात्रता निकषाप्रमाणे एखादा खेळाडू जर तीन वर्षे इंग्लंडमध्ये स्थायिक असेल तर तो इंग्लंड संघाकडून खेळण्यास पात्र आहे.

याआधी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा पात्रता निकष  हा जर एखादा खेळाडू  हा 18 व्या वाढदिवसानंतर 7 वर्षे इंग्लंडमधील निवासी असेल तर तो इंग्लंडकडून खेळण्यास पात्र होता.

त्यामुळे इंग्लंडकडून खेळण्यास पात्र ठरण्यासाठी वाट पाहिल असे याआधीच जोफ्रा आर्चरने स्पष्ट केले होते.

बार्बाडॉसमध्ये जन्मलेला आर्चर याआधी आॅक्टोबर 2013 मध्ये विंडीजच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. तसेच तो बिगबॅश लीग, आयपीएल, पाकिस्तान सुपर लीग अशा लीग स्पर्धांमध्येही खेळला आहे. तो 2015 मध्ये इंग्लंडला स्थायिक झाला आहे.

इंग्लंड संघात विंडीजचाच आणि बार्बाडॉसमध्ये जन्मलेला ख्रिस जॉर्डनही खेळतो. त्यामुळे आता या दोघांनाही संघसहकारी बनण्याची संधी आहे.

इंग्लंडचा संघ जानेवारी 2019 मध्ये विंडिज दौरा करणार आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना किंग्सटॉन ओव्हल मैदानावर होणार आहे. हे आर्चरचे घरचे मैदान आहे. त्यामुळे आर्चरने या कसोटी सामन्यात कुटुंबासमोर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हा नवीन नियम 1 जानेवारी 2019 पासून लागू होणार आहे. त्यामुळे खेळाडूला तीन वर्षांच्या कालावधीत 210 दिवसाचा निवास आवश्यक आहे. त्यामुळे आर्चर मार्च 2019 पर्यंत इंग्लंड संघाकडून खेळण्यास पात्र ठरु शकतो.

मात्र आर्चरच्या पात्रतेची तारिख ही तो इंग्लंडबाहेर 2018/19 दरम्यान किती वेळ घालवणार आहे, यावर अवलंबून आहे. पण मेमध्ये होणाऱ्या विश्वचषकाआधी मात्र निश्चितपणे आर्चर इंग्लंडकडून खेळण्यास पात्र ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

विराटला शत्रू नव्हे, मित्र बनवा; हा अजब सल्ला दिला आहे आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने

तोच महिना, तोच सामना, ठिकाणही तेच; टीम इंडियाबरोबर घडला विचित्र योगायोग

कर्णधार कोहलीच्या या कृतीमुळे चाहते नाराज, ट्विटरवरुन सुनावले खडेबोल

Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित

मैदानावरुन पृथ्वी शाॅला अक्षरश: उचलुन ड्रेसिंग रुममध्ये नेले