Video: ‘तूला कंटाळा येत नाही का?’लायनचा पुजाराला प्रश्न

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात आज(4 जानेवारी) दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 24 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे.

या डावात भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने शतके केली आहेत. तर रविंद्र जडेजा आणि मयंक अगरवालने अर्धशतके केली आहेत. पुजाराचे तर या मालिकेतील हे तिसरे शतक आहे.

त्याने या मालिकेत आत्तापर्यंत 1258 चेंडूचा सामना केला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटीमालिकेत सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाज त्याला चांगलेच वैतागलेले दिसून आले.

या सामन्यात तो फलंदाजी करत असताना एका वेळी तर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने कारकिर्दीतील 18 वे कसोटी शतक पूर्ण करणाऱ्या पुजाराला विचारले की ‘तूला अजून कंटाळा आला नाही का?’ यावर पुजाराने फक्त हसून प्रतिसाद दिला.

पुजाराने या सामन्यात 373 चेंडूत 193 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 22 चौकार मारले. मात्र तो द्विशतक करण्यापासून फक्त 7 धावांनी वंचित राहिला. त्याला 130 व्या षटकात नॅथन लायनने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले.

त्याचबरोबर या डावात पंतने नाबाद 159 धावा, जडेजाने 81 धावा आणि अगरवालने 77 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

जगात कुणाला जे जमले नाही ते टीम इंडियाच्या २१ वर्षीय पंतने केले

कांगारुंना त्यांच्याच मातीत चितपट करणारा रिषभ पंत भारतातील पहिलाच विकेटकीपर

शतक केले पुजारा-पंतने, विक्रम झाला टीम इंडियाच्या नावावर