ISL 2017: आणि रणबीर कपूरने घेतली अर्जुन कपूरची गळाभेट

पुणे : काल येथील झालेल्या एफसी पुणे सिटी विरुद्ध मुंबई एफसी सिटी सामन्यात पुण्याने मुंबईचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत एमिलियानो अल्फारो याने नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. घरच्या मैदानावरील एफसी पुणे सिटीने आजच्या विजयामुळे गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

पुण्यात या मोसमात झालेल्या या सामन्याला पुणे संघाचा सहमालक अर्जुन कपूर पहिल्यांदाच आला होता तर मुंबईचा सहमालक असलेला रणबीर कपूरही या सामन्याला हजर होता.

महाराष्ट्र डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामन्याला तब्बल ८५०० फुटबॉल प्रेमींनी होती. सामन्याच्या पहिल्या हाल्फमध्ये कोणताही गोल न झाल्यामुळे पुण्याचा सहसंघमालक असलेला अर्जुन कपूर चांगलाच नाराज दिसत होता. परंतु पुण्याने दुसऱ्या हाल्फमध्ये केलेल्या संधीचे सोन्यामुळे अर्जुनाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सामना जिंकल्यावर त्याने काही वेळ जोरदार सेलेब्रेशनही केले.

यावेळी मैदानात पुण्याला जोरदार पाठिंबा देणारी ऑरेंज आर्मीही उपस्थित होती. सामना संपल्यावर अर्जुन कपूरने रणबीर कपूरची खास गळाभेट घेतली. रणबीर आणि अर्जुन हे दोघेही संघमालक हे चांगले फुटबॉल खेळतात तसेच ते संघाच्या बहुतेक सामन्यांना हजेरी लावतात. या दोघांची एक खास झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांचे काही चाहते मैदानावर आले होते.